Malegaon News : घरकुल लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले; प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदान हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे रखडले

₹6 Crore PMAY Funds Stuck for Malegaon Beneficiaries : मालेगाव तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या सुमारे १,१८६ लाभार्थ्यांचे पहिले आणि दुसरे अनुदान हिशोब विभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे थकले आहे. त्यामुळे हक्काचे घर बांधण्यासाठी या लाभार्थ्यांना व्याजाने पैसे काढून कामे करावी लागत आहेत.
PMAY issue

PMAY issue

sakal 

Updated on

मालेगाव: प्रधानमंत्री आवास योजनेत १८ हजार घरे मंजूर झाली. मात्र हिशोब विभागाच्या दिरंगाईमुळे प्रणालीत मंजुरी अभावी घरकुल लाभार्थ्यांचा पहिल्या टप्प्यातील ७२५ तर दुसऱ्या टप्प्यातील ४६१ लाभार्थ्यांचे सुमारे सहा कोटी रुपये थकले आहेत. परिणामी, लाभार्थ्यांना व्याजाने पैसे काढून घरकाम करावे लागत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com