Girish Mahajan
sakal
मालेगाव: राज्यात लहान मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून, अशा अमानुष गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विद्यमान कायद्यात कठोर सुधारणा करण्याची गरज आहे. बालकांवरील अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद असलेले ‘यज्ञा सुधारणा विधेयक’ (पोस्को राज्य दुरुस्ती विधेयक २०२६) तातडीने लागू करावे, अशी ठाम मागणी भारतीय जनता पक्षाच्या कायदा सेलतर्फे करण्यात आली आहे.