Malegaon News : मालेगाव हादरले! चिमुकलीच्या खुनाचा खटला आता निर्णायक वळणावर; २७ जानेवारीला होणार पुढील सुनावणी
Hearing Continues in Malegaon POCSO Murder Case : मालेगाव विशेष न्यायालयात सुरू असलेल्या डोंगराळे (ता. मालेगाव) येथील चिमुकलीच्या अत्याचार व हत्या प्रकरणातील सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी साक्षीदारांची साक्ष नोंदवली असून, पुढील सुनावणी २७ जानेवारीला निश्चित करण्यात आली आहे.
मालेगाव: डोंगराळे (ता. मालेगाव) येथील सव्वाचार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दाखल खटल्याची सुनावणी येथील विशेष न्यायालयात न्यायाधीश के. आर. पाटील यांच्यासमोर सुरू आहे.