Bike Theft
sakal
मालेगाव: शहर व परिसरातून दुचाकी चोरीच्या घटनांना २०२४ व २५ मध्ये उधाण आले होते. येथे घरासमोरून, चौकातून, मॉल यासह अनेक ठिकाणांहून दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. यामुळे सर्व दुचाकीमालकांमध्ये भीती पसरली होती. पोलिसांनी २०२५ मध्ये चोरांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. कॅम्प व शहर उपविभागीय पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेने चोरांकडून सुमारे चारशे दुचाकी जप्त केल्या आहेत.