Postal Department : मालेगाव टपाल विभागाने गाठला लाखाचा टप्पा! बचत खाते उघडण्याचा नवा उच्चांक

Indian Postal Department
Indian Postal Departmentesakal

देवळा (जि. नाशिक) : भारतीय डाकच्या मालेगाव विभागाने २०२२ -२३ या आर्थिक वर्षात पोस्टाची एक लाखांवर बचत खाते उघडत नवा उच्चांक गाठला आहे. याशिवाय इतर सर्व प्रकारची मिळून पावणेसहा लाखांपेक्षा जास्त खातेदारांची संख्या झाली आहे.

यामुळे ग्रामीण भागात बचतीचे महत्त्व वाढीस लागून ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात पोस्टल बँकेकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. (Malegaon Postal Department reached milestone of one lakh opening savings accounts nashik news)

पूर्वी टपाल विभागात पत्रांची देवाणघेवाण, मनीऑर्डर आणि अजून काही अशीच मर्यादित स्वरूपात कामे होती. आता स्मार्टफोन आल्याने निरोपाची देवघेव जलद होऊ लागली आहे.

यामुळे पत्रांची संख्या कमी झाली असली तरी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत पोस्टात आर्थिक स्वरूपाची कामे होऊ लागली आहेत. तसेच टपाल विभागात बचत खात्याबद्दल नवनवीन सकारात्मक बदल झाल्याने ग्राहकांची संख्या वाढत आहे.

भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत बजाज अलियन्झ कॅशलेस अपघात विमा पॉलिसीलाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने येथे खाते उघडणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

आता पोस्टात बँकेसारखे व्यवहार होऊ लागल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांची सोय झाली आहे. पोस्टाबाबत पूर्वीपासूनच विश्वसनीयता असल्याने पैशांची गुंतवणूक सहज केली जाते. यामुळे लोकांमध्ये बचतीची भावना चांगलीच रुजू लागली आहे.

भारतीय डाक विभागात आता नवनवीन आणि अद्ययावत सुविधा आल्याने पोस्टातील राबता वाढला आहे. टपालासोबत पैशांची देवाणघेवाण अधिक झाल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे मालेगाव विभागात बचत खातेसह इतरही सर्वच खात्यांचा आलेख वाढता आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

Indian Postal Department
Ideal Wedding : वणीत मुस्लिम समाजात आदर्श विवाह; पाहण्याच्या कार्यक्रमातच आटोपला निकाह!

"पोस्टाचे विविध उपक्रम तसेच बचत योजना ग्रामीण भागात पोचल्याने लोकांमध्ये बचतीची सवय लागली आहे. पोस्टात आर्थिक सुविधा मिळू लागल्याने यावर्षी मालेगाव विभागात बचत खात्यांनी लाखाचा टप्पा ओलांडत इतरही खाती वाढत आहेत. पोस्टाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जवळच्या टपाल कार्यालयात संपर्क साधा."

- भरत पगार, मालेगाव डाक अधीक्षक

मालेगाव विभागात असलेली बचत खात्यांची स्थिती

- बचत खाती : १४०७९३

- आवर्ती ठेव खाती : २१९६५७

- मुदत ठेव खाती : ५२९३८

- सुकन्या समृद्ध खाते : ६३०९३

- मासिक प्राप्ती योजना : १०४४६

- ज्येष्ठ नागरिक योजना : ६९६०

- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी : १७४७९

- राष्ट्रीय बचत पत्रे : ३१५५५

- किसान विकास पत्रे : ३४५६१

Indian Postal Department
Nashik News : कालबाह्य ठरलेल्या पालिका इमारतीचे रुपडे पालटण्याची आवश्यकता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com