
माळेगाव : भाटघर, नीरा देवघर व वीर धरणातील पाण्याची उत्तम स्थिती आणि माळेगाव कारखाना कार्यक्षेत्रात आजवर झालेला चांगला पाऊस विचारात घेता ऊस लागवडीचे धोरण चांगले राहिल. त्या ऊस लागवडीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर होण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय आगामी काळात शेतकऱ्यांच्या शिवारातील उभ्या ऊसाचे गाळप वेळत होण्यासाठी कारखाना कार्य स्थळावर सध्या यंत्रसामुग्रीच्या देखभाल दुरूस्ती कामाला वेग आला आहे, अशी माहिती मावळते अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी दिली.