घरपट्टी व पाणीपट्टी मालमत्ता धारकांसाठी महापालिका प्रशासनाकडून दंडात्मक व्याजावर ९० टक्के सूट

घरपट्टी व पाणीपट्टी मालमत्ता धारकांसाठी महापालिका प्रशासनाकडून दंडात्मक व्याजावर ९० टक्के सूट
Published on: 
घर, पाणीपट्टीवर दंडात्मक व्याजावर ९० टक्के सूट मालेगाव कॅम्प : येथील मालेगाव महापालिकेत २२ ऑक्टोबर ते २२ डिसेंबर २०२६ या कालावधीत आर्थिक वर्षाचे मागणी बिलाप्रमाणे थकबाकीसह एक रकमी कराचा भरणा केल्यास घरपट्टी बिलातील दंडात्मक व्याजावर ८० ते ९० टक्के सूट देण्यात येत आहे. थकबाकीदारांनी घरपट्टी व पाणीपट्टी करांचा एकरकमी भरणा करून दंडात्मक व्याज व शास्तीवर सूटचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.महापालिकेने डिजिटल क्यूआर कोड स्कॅनची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी ऑनलाईन पेमेंटवर कर भरणा करता येणार आहे. नागरिकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन सुविधेचा वापर करून भरणा करावा. असे आवाहन आयुक्त रवींद्र जाधव यांनी केले आहे. मालेगावला २२ जनावर पोलिसांकडून हस्तगत मालेगाव : शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे बांधून ठेवलेली २ लाख २७ हजार रुपये किंमतीची २२ जनावरे पोलिसांनी जप्त केली. येथील पवारवाडी भागातील गट नं. ११० मधील काटेरी झुडूपात १ लाख १३ हजार रुपये किंमतीची ९ गोवंश जातीची जनावरे कत्तलीच्या उद्देशाने जखडून बांधून ठेवण्यात आली होती. पोलिसांनी जनावरे जप्त केली आहेत. पवारवाडी पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिकन हाजी यांच्या कारखान्याच्या बाजूला असलेल्या गोदामातून १ लाख ९४ हजार रुपये किंमतीची १३ जनावरे जप्त केली. पवारवाडी पोलिस ठाण्यात मोईन (पुर्ण नाव माहित नाही) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. फरार असलेल्या मोईनचा पोलिस शोध घेत आहेत. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com