esakal | यंदा जुम्मा की नमाज घरातच..आता मशिदी उघडण्याची प्रतीक्षा 
sakal

बोलून बातमी शोधा

namaj.jpg

शुक्रवारी (ता. 5) जुम्माची नमाज अंशत: लॉकडाउन उघडल्यानंतर घरीच पठण झाली. जुम्मा नमाजाला मोठे महत्त्व आहे. 90 टक्के मुस्लिम बांधव जुम्माची दुपारची नमाज मशिदीतच पठण करतात. 

यंदा जुम्मा की नमाज घरातच..आता मशिदी उघडण्याची प्रतीक्षा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तब्बल अडीच महिन्यांचा लॉकडाउन शहराने अनुभवला. शब-ए-बरात, रमजान ईदचे नमाजपठण घरी केल्यानंतर शहरवासीयांना आता मशिदी उघडण्याची प्रतीक्षा आहे. शुक्रवारी (ता. 5) जुम्माची नमाज अंशत: लॉकडाउन उघडल्यानंतर घरीच पठण झाली. जुम्मा नमाजाला मोठे महत्त्व आहे. 90 टक्के मुस्लिम बांधव जुम्माची दुपारची नमाज मशिदीतच पठण करतात. 

यंत्रमाग सुरू होणार 
25 मार्चला लॉकडाउन जाहीर झाल्यानंतरचा आज दहावा शुक्रवार होता. शहरातील मशिदीतील नमाजपठण बंद आहे. यंत्रमाग, दुकाने उघडल्याने येथील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. तरीही जुम्मा नमाज शुक्रवारी घरीच पठण करण्यात आली. कुल जमाती तंजीम, जमेतुल उलेमा यांसह सर्व धार्मिक संघटना, मुल्ला मौलवी यांनी घरी नमाजपठण करण्याचे आवाहन केले होते. पोलिस, महसूल व महापालिका प्रशासनाने याबद्दल समाधान व्यक्त केले. 
शुक्रवारी पूर्व-पश्‍चिम भागात बहुसंख्य दुकाने, आस्थापना सुरू झाल्या. शनिवार (ता. 6)पासून शहरातील आणखी काही यंत्रमाग सुरू होतील. अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, समन्वय अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनील कडासने, आयुक्त त्र्यंबक कासार, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी अपर जिल्हाधिकारी कार्यालयात यंत्रमाग मालकांसमवेत चर्चा केली. त्यात नव्याने आणखी यंत्रमाग सुरू होतील, कापडाला उठाव हवा, सर्व सुरळीत होईल, असे यंत्रमागधारकांनी सांगितले. 

हेही वाचा >...अन्यथा सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन कापणार...वाचा सविस्तर

बहुसंख्य दुकाने सुरू
दरम्यान, प्रशासनाने शुक्रवारी सुटीचा मुहूर्त साधून अक्‍सा कॉलनी भागात सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. श्री. कडासने, डॉ. हितेश महाले यांनी मार्गदर्शन केले. ऊर्दू भाषेतील कोरोनाविषयक जनजागृती पत्रकवाटप करण्यात आले. संगमेश्‍वर भागातही बैठक झाली. शनिवारपासून पश्‍चिम भागात मराठी भाषेतील पत्रकांचे वाटप होणार आहे. कोरोनाचा संसर्ग व "मिशन बिगिन अगेन'नंतर घ्यावयाच्या काळजीविषयी सहज सोप्या भाषेत माहिती व सूचना यात दिल्या आहेत.  

हेही वाचा > काय सांगता...कोरोनाबाधित रुग्ण पाचव्या दिवशीच जाणार घरी?...पण