मालेगाव- शहरात वाढते तापमान अनेकांना डोकेदुखी ठरत आहे. त्यात तापमानामुळे रस्त्यावर अनेक शीतपेयांच्या हातगाड्या लागल्या आहेत. उन्हापासून बचावासाठी नागरिक शीतपेय पितात. शीतपेय प्यायल्यानंतर अनेकांना खोकला, सर्दी, ताप यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.