Malegaon Shivpuran Katha : शिवमहापुराण कथेमुळे बदलली मालेगावची प्रतिमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pandit Pradip Mishra & Dada Bhuse

Malegaon Shivpuran Katha : शिवमहापुराण कथेमुळे बदलली मालेगावची प्रतिमा

मालेगाव (जि. नाशिक) : दंगल, बॉम्बस्फोटाचे व अतिसंवेदनशील शहर अशी चर्चा मालेगावची संपूर्ण राज्यासह देशभरात झालेली आहे. मात्र चालू वर्षात झालेल्या दोन मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून अतिसंवेदनशील असलेल्या मालेगावकरांकडून मात्र सामाजिकतेचा संदेश संपूर्ण देशात गेला आहे.

यासाठी कारण ठरले आहे ते दोन दिवशीय इज्तेमा आणि पंडीत श्री प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथा. (Malegaon Shiv Puran Katha image of Malegaon changed due to Shiv Mahapuran story nashik news)

मालेगाव म्हटले की दंगल, बॉम्बस्फोटाचे व अति संवेदशील शहर अशी चर्चा राज्य व देशभर होत असते. येथील सर्व धर्मीय गुण्यागोविंदाने राहतात. येथील चांगल्या गोष्टींचा प्रचार, प्रसार फारसा झाला नाही ही दुर्दैवाची बाब आहे. पुण्य श्री शिवमहापुराण कथेच्या गर्दी आणि इज्तेमाने मालेगावला टोमणे मारणाऱ्यांना सणसणीत चपराक मारली आहे.

श्री शिव महापुराण कथेच्या निमित्ताने संपूर्ण आठवडाभर राज्यासह देशभरात मालेगावचे नाव चर्चेत आले. राज्याच्या कानाकोपऱ्यातील तसेच अन्य राज्यातील लाखो भाविकांनी मालेगावला हजेरी लावत ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार झाले. कथेच्या सात दिवस जवळपास पन्नास हजाराहून अधिक भाविक मालेगावी मुक्कामी होते.

यात महिला भाविकांचा समावेश मोठ्या प्रमाणावर होता. देवाधिदेव महादेवांच्या कथा श्रवणासाठी आलेल्या लाखो भाविकांना सर्व धर्मीय मालेगावकरांनी दिलेली सेवा अभूतपूर्व होती. मसगा महाविद्यालय व पोलिस कवायत मैदानाच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढणाऱ्या शिवभक्तांनी मालेगावची प्रतिमा बदलली आहे.

हेही वाचा: Nashik News : नांदगावला हद्दवाढीसह नळपाणी पुरवठा योजना; कांदे यांच्या पाठपुराव्याला यश

शिव महापुराणसाठी येथे पाच लाखांहून अधिक भाविकांनी कथेला हजेरी लावली. अखेरच्या दोन दिवसात मैदान हाऊसफूल झाल्याने कॉलेज रोड, कॅम्प रोडवर भाविकांनी ताबा घेतला होता. आजवरच्या सर्व विक्रम या दोन दिवसातील गर्दीने मोडून काढले.

मालेगावने दोन दशकापासून शांततेची कूस घेतली आहे. २००१ पासून सर्व धर्मीय राष्ट्रीय एकात्मतेची जोपासना करत आनंदात राहत आहेत. दंगल, बॉम्बस्फोट, कोरोना अशा विविध कारणांनी मालेगावला बदनाम केले जाते.

परंतु मालेगावात पंधरा दिवसात झालेला हिंदू व मुस्लीम समाजाच्या धार्मिक कार्यक्रमाने संपूर्ण देशाला सामाजिकतेचा संदेश दिला आहे. मुस्लीम बांधवांचा येथील सायने बुद्रूक औद्योगिक वसाहतीत इज्तेमा झाला. दोन

दिवसाच्या इज्तेमा कार्यक्रमास लाखोंची उपस्थिती होती. त्या पाठोपाठ हिंदू बांधवांच्या शिवमहापुराण कथा लाखो श्रध्दाळूंच्या उपस्थितीत निर्विघ्नपणे पार पडली.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nashik News : कांद्याचे क्षेत्र वाढल्याने रोपांसाठी शेतकरी त्रस्त

शिवमहापुराण कथा स्थळावर रात्रीचे दृश्‍य पाहण्यासारखे होते. हजारो महिला व पुरुष भाविक महादेवाचे भजन नाचत गात आनंद साजरा करत होते. विशेष म्हणजे यात तरुणाईचा समावेश लक्षणीय होता. महादेवाच्या या भाविकांना सुरक्षिततेची कुठलीही भीती वाटली नाही. मध्यरात्री उशिरा पर्यंतचा गजर व मालेगावकरांनी पाहुण्या भाविकांची केलेली सेवा अद्वितीय होती.

दानशूर व सेवेकऱ्यांच्या हजारो हातांनी लाखो भाविकांची मनोभावी सेवा केली. कसमादेसह इतर जिल्ह्यातूनही अनेक दानशूरांनी सेवेत हातभार लावला. अति संवेदनशील असलेल्या मालेगावची नवी ओळख निर्माण करण्यास सर्व घटकांसह मालेगावकरांच्या अथक मेहनतीचा मोठा वाटा आहे.

"महादेवांच्या आशिर्वादाने मालेगावकरांनी भाविकांच्या सेवेसाठी अपार कष्ट घेतले. भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. ज्ञात, अज्ञात हजारो जणांनी यात खारीचा वाटा उचलला आहे. रोज पाच लाखावर भाविक येणे. हजारो भाविक सात दिवस मुक्कामी राहणे. कोणतेही गालबोट न लागता सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. श्री महादेवाच्या आशीर्वादाने हे सर्व घडले." - दादा भुसे, पालकमंत्री नाशि

हेही वाचा: Nashik News : सटाण्यात दिवसाढवळ्या घरफोडी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण