मालेगाव: येथील सोयगाव भागात आयुर्वेदिक डॉक्टर व त्याचे साथीदार गर्भपात केंद्र चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हे शाखेने छापा टाकून या ठिकाणाहून गर्भपात करण्यासाठी लागणाऱ्या तीन लाखांच्या गोळ्या व औषधे जप्त केले आहेत. या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात डॉक्टरासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.