Sunanda Ahire
sakal
मालेगाव: शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण बनत चालला आहे. अखेर या समस्येने मानवी जीव घेतला असून, सटाणा नाका परिसरातील सुनंदा सखाराम पाटील (अहिरे) यांचा गायीच्या हल्ल्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे. या बाबत ‘सकाळ’ विविध वृत्तप्रसिद्ध करून आवाज उठविला होता. मात्र निद्रेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाची ही महिला अखेर बळी ठरली आहे.