esakal | मालेगाव उपविभागात ४३ टक्के पेरण्या; पावसाअभावी कामे रखडली
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

मालेगाव उपविभागात ४३ टक्के पेरण्या; पावसाअभावी कामे रखडली

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : मालेगाव उपविभागातील मालेगाव, सटाणा व नांदगाव या तीन तालुक्यांमध्ये ५ जुलै अखेर सरासरी ४३.१० टक्के पेरण्या झाल्या आहेत. मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ५५ टक्के, सटाणा ३७.०७ तर नांदगावमध्ये ३४.२२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. उपविभागीय बहुतांशी गावांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरण्यांची कामे रखडली आहेत.


मालेगाव तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र ८२ हजार १९३ हेक्टर असून, आतापर्यंत ४५ हजार २०९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सटाणा तालुक्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत. तालुक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६७ हजार ८६१ हेक्टर असून, आतापर्यंत ३७ टक्के एवढेच पेरणीचे काम पूर्ण झाले आहे. नांदगाव तालुक्यात जूनमध्ये १८३ मिलीमीटर पाऊस झाला. उपविभागात सर्वाधिक पाऊस झाला असला तरी नांदगावमध्ये पेरणींचे काम संथ गतीने होत आहे. तालुक्यात सर्वसाधारण क्षेत्र ६३ हजार ९९१ हेक्टर असून, ५ जुलै अखेर २१ हजार ९०० हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. उपविभागात एकूण सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १४ हजार ४५ हेक्टर असून आतापर्यंत ९२ हजार २६४ हेक्टरवर पेरणींचे काम पूर्ण झाले आहे. तीनही तालुक्यांमध्ये मक्याची सर्वाधिक पेरणी होत आहे. उद्दिष्टांपैकी मक्याची ५० टक्के पेरणी झाली आहे.

(malegaon sub-division have sown 43 percent on an average)

हेही वाचा: परमवीर सिंगच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलीसाकडून गंभीर आरोप

loading image