Samadhan Mali
sakal
मालेगाव: ‘माझा मुलगा परत दे...!’ असा कण्हत फोडलेला टाहो समाधानच्या आई कल्पनाबाई माळी यांनी तालुका पोलिस ठाण्याच्या आवारात ठोकला आणि क्षणभर संपूर्ण वातावरण सुन्न झाले. पाडळदे गावातील १५ वर्षीय समाधान बळिराम माळी याचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (ता. १२) रात्री उघडकीस आली.