Nashik News: मालेगाव तहसील कार्यालयाची तत्परता; 15 मिनिटात दिली शिधापत्रिका!

Tehsildar Nitin Kumar Deore giving immediate ration card to Anusayabai Sonwane of Dabhadi.
Tehsildar Nitin Kumar Deore giving immediate ration card to Anusayabai Sonwane of Dabhadi.esakal

Nashik News : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग अंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध सेवांमध्ये शिधापत्रिका हा गरीब व सामान्य नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. शिधापत्रिकेसाठी नागरिकांचा अनेकदा वेळ व पैसा खर्च होतो.

यावर उपाय म्हणून तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी पुरवठा विभागात शिधापत्रिका मिळवण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना अर्ज जमा केल्यानंतर तत्काळ शिधापत्रिका देण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

यामुळे दाभाडी (ता. मालेगाव) येथील अनुसयाबाई सोनवणे व अनाथ विद्यार्थी सचिन पाटील यांना अवघ्या १५ मिनिटात शिधापत्रिका मिळाली. (Malegaon Tehsil Office readiness Ration card given in 15 minutes Nashik News)

Tehsildar Nitin Kumar Deore giving immediate ration card to Anusayabai Sonwane of Dabhadi.
Nashik News: वारसा हक्काने नोकरी देण्यावर दिवाळीनंतर निर्णय; पालकमंत्र्याचे आश्‍वासान

तहसीलदार श्री. देवरे यांना भेटून अनुसयाबाई यांनी वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ शिधापत्रिका मिळते का? अशी विचारणा केली. तहसीलदारांनी पुरवठा कर्मचारी सुजित केदार यांना तत्काळ शिधापत्रिका बनविण्याच्या सूचना दिल्या.

अवघ्या पंधरा मिनिटात अनुसयाबाई सोनवणे यांना शिधापत्रिका मिळाली. यामुळे अनुसयाबाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले.

पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या मांजरे (ता.मालेगाव) येथील सचिन पाटील या अनाथ बालकास देखील पुरवठा अधिकारी प्रशांत काथेपुरी व निवृत्त नायब तहसीलदार आर. पी. कुवर यांच्या पुढाकाराने तत्काळ शिधापत्रिका देण्यात आली.

Tehsildar Nitin Kumar Deore giving immediate ration card to Anusayabai Sonwane of Dabhadi.
Nashik Political News: अकार्यक्षम नेतृत्वामुळे बागलाण दुष्काळी यादीतून बाहेर : केशव मांडवडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com