Malegaon parking problem
sakal
नाशिक
Malegaon Traffic : मालेगावात वाहतूक कोंडीचा बोजवारा; बेशिस्त पार्किंगमुळे नागरिक हैराण, पालिका-पोलिसांकडून कठोर निर्णयाची मागणी
Unregulated Parking Triggers Daily Traffic Chaos in Malegaon : मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर बेकायदेशीर पार्किंग आणि हॉकर्स झोनच्या अभावामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे. नागरिकांनी महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे अधिकृत पार्किंगची मागणी केली आहे.
मालेगाव शहर: मालेगाव शहरात अनेक रस्त्यांवर पार्किंगच्या व्यवस्थेचा अभाव असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरातील मोसमपूलसह सटाणा नाका, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, साठफुटी रोड, रावळगाव नाका, बसस्थानक परिसरातील पार्किंगमुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो. परिणामी दिवसभर वाहतूक खोळंबते. पालिकेने या प्रश्नावर ठोस भूमिका घेत शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने मार्ग काढावा, प्रसंगी कठोर निर्णय घ्यावेत अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.
