मालेगाव- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मालेगाव शहरातील रक्तमिश्रीत पाणी, सायजिंगमधून निघणारे प्रदूषण, तसेच येथील ऊर्दू शाळांमध्ये झालेला कथित भ्रष्टाचार या संदर्भात यापूर्वी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनीही प्रश्न उपस्थित केला होता. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही या शाळांत गैरव्यवहार झाल्याची लक्षवेधी सूचना मांडली. यावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या सर्व प्रकरणाची ‘एसआयटी’मार्फत चौकशी केली जाईल, दोषींवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.