झोडगे: अस्ताने (ता. मालेगाव) येथील शेतकरी कुटुंबावर गणेश चतुर्थीला काळाने घाला घातला. जळकू शिवारातील शेत पाहणीसाठी गेलेला तरुण शेतकरी नीलेश राजेंद्र देवरे (वय २१) याचा दुर्दैवी अपघात झाला. विहिरीच्या काठावर उभ्या असताना बैलाने अचानक मान फिरवली आणि नीलेश थेट ५० फूट विहिरीत कोसळला.