मालेगाव- येथील कुसुंबा फुले नगर ते दसाणेपर्यंतचा ३० कोटीचा रस्ता १५ दिवसात कुठे गायब झाला. या रस्त्याची लाच लूचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे प्रदीप मोरे यांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाइलने आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.