मालेगाव- श्री व्यंकटेश को-ऑपरेटिव्ह बँकेच्या पदाचा गैरवापर करीत बनावट कर्जखाते उघडून १४ लाखांचे कर्ज उचलल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री प्रशांत हिरे, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे आणि शिवसेना (उबाठा) पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यासह इतरांवर करण्यात आला आहे. यासंदर्भात गांधी विद्यामंदिर संस्थेतील उपशिक्षक विलास पगार यांनी कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे मालेगावच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही कारवाई राजकीय आकसापोटी केल्याचे माजी आमदार डॉ. हिरे यांनी सांगितले.