esakal | तिसऱ्या लाटेत सुपरस्प्रेडर मुलांमध्ये कोरोनाचे घातक स्वरूप; पालकांना सावधानतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

children

गेल्या सव्वा वर्षापासून चाललेल्या कोरोनाच्या हाहाकारचे पडसाद लहान मुलांवरही दिसू लागले आहेत. पहिल्या लाटेत मुलांना जास्त काही त्रास होत नाही असे म्हणत असताना आता मात्र दुसऱ्या लाटेत मुलांवरही बऱ्यापैकी प्रमाणात परिणाम दिसून आले आहेत.

तिसऱ्या लाटेत सुपरस्प्रेडर मुलांमध्ये कोरोनाचे घातक स्वरूप

sakal_logo
By
प्रशांत कोतकर

नाशिक : गेल्या सव्वा वर्षापासून चाललेल्या कोरोनाच्या (Coronavirus) हाहाकारचे पडसाद लहान मुलांवरही दिसू लागले आहेत. पहिल्या लाटेत मुलांना जास्त काही त्रास होत नाही असे म्हणत असताना आता मात्र दुसऱ्या लाटेत मुलांवरही बऱ्यापैकी प्रमाणात परिणाम दिसून आले आहेत. आता तर तिसऱ्या लाटेत बालकांना सावधानतेचा इशारा देऊन पूर्ण तयारीत राहण्यास सांगितले आहे. (malignant nature of the coronavirus in super spreader children in the third wave of corona)

लहान मुलांमध्ये कोविडची लक्षणे व टेस्ट पॉझिटिव्ह आहे असे बघत असताना कित्येक वेळा घरातील इतर सदस्यांना काहीच लक्षणे नसतात. म्हणजेच लहान मुले इतरांना आजार पसरवू शकतात. त्यांना सुपरस्प्रेडर म्हणूनच म्हणतात. दुसऱ्या लाटेत राज्यात हजारो बालकांना कोविडची लागण झालेली आहे. मार्च महिन्यांपर्यंतच्या सर्वेक्षणात जवळजवळ ५० हजार मुलांना बाधा झालेली आहे. यामध्ये टेस्ट न केलेल्या बालकांची संख्या एकत्र केल्यास नंबर कित्येक पटीने वाढेल.

आजार होण्याचे कारण

-नवीन स्ट्रेन (डबल म्युटंट स्ट्रेन)

-मोठ्यांनी न घेतलेली काळजी

-मधल्या काळातील मुलांचा बाहेर वाढलेला वावर

लक्षणे

पाच वर्षांवरील मुले : ताप, उलट्या, पोटात दुखणे, जुलाब, मळमळ, अतिसार, अतिशय थकवा, सुस्ती येणे.

पाच ते दहा वर्षांमधील मुले : थंडी, ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, जुलाब, उलट्या.

दहा वर्षांवरील मुले : घसादुखी, खोकला, ताप, अंगदुखी, उलट्या, जुलाब, चव व वास न येणे.

धोक्याची किंवा तीव्र आजाराची लक्षणे काय?

तीव्र ताप, अतिसार, श्‍वसनास त्रास, सातत्याने उलट्या, लघवीचे प्रमाण कमी होणे, सुस्त व निस्तेजपणा, मल्टी सिस्टिम इन्फ्लेटरी सिंड्रोम.

चौकट

अंदाज न लावता तज्ज्ञांचा सल्ला घ्या

लहान मुलांमध्ये लक्षणे दिसताच थंड पाणी, ज्यूस पिण्यामुळे झाले असेल किंवा गार वाऱ्यामुळे झाले असेल असे उगाचच अंदाज करत बसण्यापेक्षा उशीर न करता तुमच्या बालरोगतज्ज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. वेळीच तपासणी करणे व त्वरित

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज

निदान होऊन उपचार करणे अगदी गरजेचे आहे. ८० ते ९० टक्के मुले योग्य मार्गदर्शनाखाली व उपचारामुळे घरीच बरी होत आहेत; परंतु १० टक्के मुलांमध्ये आजाराचे घातक स्वरूप दिसून येत आहे.

-डॉ. दीपा जोशी, बालरोग व नवजात शिशुतज्ज्ञ

(malignant nature of the coronavirus in super spreader children in the third wave of corona)

हेही वाचा: नाशिकमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या पोहोचली ३०१ पर्यंत