Police Recover ₹11 Lakh and Seize Vehicles : मुंबई-आग्रा महामार्गावर व्यापाऱ्यांची कार अडवून २५ लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीला मकोका अंतर्गत अटक करण्यात आली असून सहा आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठवले आहे.
मालेगाव- येथील मुंबई-आग्रा महामार्गावर व्यापाऱ्यांची कार अडवून २५ लाख रुपये लुटण्याचा प्रकार घडला होता. यात सहाही सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी मकोका लावला आहे. यापुर्वी शुक्रवारी (ता. १३) या पाच जणांना न्यायालयात हजर केले होते.