esakal | पुन्हा तीच व्यथा! आईच्या मृत्यूनंतर 7 दिवसांनी मुलाचीही अंत्ययात्रा
sakal

बोलून बातमी शोधा

Man also died 7 days after the death of the mother

पुन्हा तीच व्यथा! आईच्या मृत्यूनंतर 7 दिवसांनी मुलाचीही अंत्ययात्रा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नामपूर (जि. नाशिक) : राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज शेकडो लोक कोरोना पॉझिटीव्ह आढळत आहेत, तसेच अनेक कोरोनाबाधितांचा या महामारीत मृत्यू देखील आहे. दरम्यान रुग्णालयात मात्र ऑक्सिजन पासून ते औषधांपर्यंत सर्वच गोष्टींचा तुटवडा होत आसल्याचे समोर येत आहे. या सगळ्या परिस्थीतीत गोरगरिबांना वेळेवर उपचार मिळत नसल्याने जीव गमवावा लागत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे

मागच्या काही दिवसांत मोसम खोऱ्यात संसर्गजन्य रोगाचा विळखा वाढत आहे. दरम्यान टेंभे वरचे ( ता बागलाण ) येथे एक अत्यंत ऱ्हद्यद्रावक घटना घडली. येथे अवघ्या सात दिवसांच्या अंतराने आई आणि मुलाचे निधन झाले आहे. या दुखःद घटणेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: अर्थव्यवस्थेला उभारी देणाऱ्या ‘देशप्रेमीं’ची पंचाईत; तंबाखूची पुडी, देशी दारू महागली

नेमके काय घडले?

टेंभे वरचे येथील माजी पोलीस पाटील तुकाराम खरे यांच्या पत्नी रखुमाबाई तुकाराम खरे ( वय ६५ ) यांचे अल्प आजाराने डांगसौंदाणे येथे निधन झाले. आजारपणाच्या काळात त्यांचा मुलगा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा कर्मचारी दिनेश तुकाराम खरे ( वय ४० ) यांनी आईची सेवा केली. मात्र या दरम्यान दुर्दैवाने त्यांना देखील या संसर्गजन्य आजाराची लागण झाली. त्यामुळे त्यांना देखील नाशिक येथे हलविण्यात आले. त्यांच्या नातेवाईकांनी खूप मेहनत घेऊनही त्यांना वेळेवर बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन, व्हेंटिलेटर उपलब्ध झाले नाही. नातेवाईकांच्या अथक परिश्रमानंतर एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करून घेण्यात आले. पण उपचारा दरम्यान त्यांचे नाशिक येथे निधन झाल्याने तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. ते बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी तात्याभाऊ खरे यांचे पुतणे होत.

हेही वाचा: नाशिकमध्ये अडीच महिन्यांतच वाढले ६७ टक्के बेड, ऑक्सिजन बेडमध्ये दुप्पट वाढ

loading image
go to top