esakal | महिलेशी बोलण्याच्या वादातून मित्राचा खून; रिजवान पार्कमधील प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

महिलेशी बोलण्याच्या वादातून झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन खूनात झाले. प्रेमाचा त्रिकोण किंवा महिलेशी मैत्रीच्या वादातून मित्राने मित्राचा खून झाला असावा.

दरेगाव शिवारात महिलेशी बोलण्याच्या वादातून मित्राचा खून

sakal_logo
By
प्रमोद सावंत


मालेगाव (जि. नाशिक) : शहराजवळील दरेगाव शिवारातील अल रिहान कंपनी परिसरातील रिजवान पार्क येथे कंपनीतील फिरोज शेख व अबुल अली या दोघांमध्ये महिलेशी बोलण्याच्या वादातून झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन खूनात झाले. नेमंगळवारी (ता. २५) रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला (man killed friend over an argument talking to a woman)

वादाचे रूपांतर खुनात

या बाबतची माहिती अशी, रिजवान पार्कजवळील मोकळ्या जागेत फिरोज शेख, अबुल अली व अतार गप्पा मारीत होते. या दरम्यान अबुल व फिरोज दारु पिऊ लागले. दोघांमध्ये कोणत्यातरी बाईला फोन केल्याच्या कारणावरुन बाचाबाची व हातगाई सुरु झाली. फैजल नामक मित्राने त्यांची सोडवासोडव केली. दोघे काही अंतरावर पुढे गेले. पुन्हा त्यांच्यात वादावादी झाली. या दरम्यान अबुल फिरोजला ''मुझे क्यों मारा'' असे म्हणत होता, काही क्षणातच अबुलने त्याच्याजवळील सुरीसारख्या धारदार हत्याराने फिरोजच्या गळ्याजवळ वार करुन त्याचा खून केला. दोघांपासून काही अंतरावर फिरत असलेल्या मोहंमद हिदायत किस्मत अली (वय १९, रा. बावनबोरी, जि. कामरुप, आसाम) व त्याचा मित्र फैजल यांनी हा प्रकार पाहिला. नजीकच्या कामगारांनी फिरोजला रिक्षातून रुग्णालयात नेले. मात्र तो मयत झाला होता. अबुल अली (रा.इऱ्याजनी, आसाम) याने फिरोज शेख (३४, रा. मुंबई) याचा धारदार हत्याराने वार करुन खून केल्याची तक्रार मोहंमद हिदायत किस्मत अली याने दिली आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात अबुल अली विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: लूट करणाऱ्यांना मोकळीक तर दाद मागणाऱ्यांवर गुन्हे - जितेंद्र भावे

ज्या महिलेच्या वादातून हा खून झाला ती संबंधित महिला कोण याबाबत निश्‍चित माहिती मिळू शकली नाही. प्रथमदर्शनी प्रेमाचा त्रिकोण किंवा महिलेशी मैत्रीच्या वादातून मित्राने मित्राचा खून केल्याचे समजते. अबुल व फिरोज कंपनीच्या एकाच खोलीत वास्तव्याला होते. उपनिरीक्षक नाजीम शेख, हवलदार बब्बु सैय्यद तपास करीत आहेत.

(man killed friend over an argument talking to a woman)

हेही वाचा: रिक्षाचालकांना मदतीची केवळ घोषणाच! हाती मात्र उपेक्षा