Women Impowerment: मंगला पळसकर यांनी साधली व्यवसायात प्रगती! चांदोरीतील 20 महिलांना रोजगार

Women making Karanji for Diwali.
Women making Karanji for Diwali.esakal

चांदोरी : आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करीत आहे. देशाचं राजकारण असो किंवा कृषी, सामाजिक, आर्थिक या सर्व क्षेत्रात महिला चांगले काम करीत आहे.

येथील महिला शेतकरी मंगल पळसकर यांनी शेती सांभाळात, आवडीचा व्यवसाय करत इतर महिलांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. (Mangala Palaskar made progress in business Employment for 20 women in Chandori nashik)

‘शिकलेली आई घरा दाराला पुढे नेई’, हे प्रेरक घोषवाक्य साध्य झाल्याचा प्रत्यय चांदोरीमध्ये आला. येथील येथील सिद्धिविनायक फुड्स समुहाच्या संचालिका मंगलताई पळसकर यांच्या उद्योगाने उंच भरारी घेतली.

गावात घरची शेती आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून. सुरवातीपासून घरात वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवून आणि त्यात विविधता आणण्याची आवड असल्यामुळे नेहमीच पदार्थ आणि स्वयंपाकांचे कौतुक होत असे.

गव्हाच्या कोंड्यापासून बी वडी तयार करून ती ननंद शोभा गाढवे यांना चवीसाठी दिली. त्यांचे पती उत्तमराव गाढवे ‌यांना बी वडीची चव फारच आवडली.

ही बी वडी मार्केटमध्ये खूप चालेल, म्हणून मंगलाताईंशी संपर्क साधला. त्यांना २० हजार रुपये देऊन त्याचे उत्पादन सुरू करण्याची पहिली ऑर्डर दिली आणि त्यास खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आणि यातूनच २०१५ ला श्री सिद्धिविनायक फुड्सची स्थापना झाली.

नंतर फक्त एकच उत्पादनावर अवलंबून न राहता उपवासाचे सर्व प्रकारचे वाळवण, साबुदाणा चकली, साबुदाणा पापड, असे उत्पादन सुरू केले. उत्पादनाचे काम वाढल्यामुळे दोन महिलांना रोजगार देत काम सुरू ठेवले.

जिथे आपले उत्पादन जात होते, तिथे तुम्ही नागली पापड, तांदूळ पापड व इतर प्रकारचे पापड तयार कराल का, म्हणून विचारणा झाली, म्हणून दोन महिलांवरून ते वाढवून ८ महिला करूनही ऑर्डर पूर्ण होत नव्हती.

त्यामुळे ऑटोमॅटिक पापड मशीन आणि मशिनला जोड लागणारे इतर मशिन्स घेत उत्पादनात वाढ केली. सर्व सुरळीत सुरू असताना, कोरोना काळात व्यवसायावर संकट आले. उत्पादन काही प्रमाणात थंडावले.

दरम्यान, कोरोना काही प्रमाणात संपुष्टात आल्यानंतर दिवाळी सुरू होणार होती, तेव्हा घरात फराळासाठी करंजी बनवली जात होती.

Women making Karanji for Diwali.
Diwali Festival: विविधरंगी आकाशकंदीलांनी व्यापली बाजारपेठ! 100 रुपयांपासून सुरवात

त्यातूनच काही करंजी नमुना म्हणून दुकानात दिली असता, त्यांना त्या करंजीची चव फारच आवडली आणि प्रथमच १०० किलो करंजीची ऑर्डर भेटली आणि तेव्हापासून प्रत्येक दिवाळीमध्ये करंजी बनवण्यास सुरुवात झाली.

२०२० मध्ये १०० किलो,‌ २०२१ मध्ये ४०० किलो, २०२२ मध्ये ९००- एक हजार किलो‌ आणि आता २०२३ मध्ये १५०० किलोच्या पुढे करंजी विकण्यात आली आहे. करंजीबरोबरच भाजणी चकली, शंकरपाळे, शेव-चिवडा‌ अशा सर्व प्रकारच्या दिवाळी फराळाच्या ऑर्डर पूर्ण केल्या जातात.

सर्व उत्पादनांचा दर्जा उत्तम ठेवल्याने ऑर्डर्समध्ये वाढ होत गेल्या. आता २२ हून अधिक महिलांना रोजगार मिळत आहे. सिद्धिविनायक फूडचे उत्पादनाला नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, बीड आणि इतर ठिकाणांहून मागणी मिळतेय.

कुटुंबाची मिळतेय साथ...

या संपूर्ण प्रक्रियेत माझा मोठा मुलगा रोहित मार्केटिंग आणि सप्लाय चेनचे काम बघतो. लहान मुलगा अक्षय मला उत्पादनात मदत करतो.

माझी मोठी सून शुभांगी उत्पादनाच्या कॉलिटीकडे लक्ष देते. सासूबाई दगूबाई पळसकर आणि लहान सून स्नेहल, पती संजय यांचाही भरपूर हातभार लागतो.

"काम करीत असताना, त्याचा दर्जा आणि काम करण्याची चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश नक्की मिळतेच."- मंगल संजय पळसकर, चांदोरी

Women making Karanji for Diwali.
Nashik Onion Crisis: पाण्याअभावी पीक सोडून देण्याची वेळ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com