Nashik Onion Crisis: पाण्याअभावी पीक सोडून देण्याची वेळ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Onion crop left by the farmers due to decrease in water level in the area and no fall of onion
Onion crop left by the farmers due to decrease in water level in the area and no fall of onionesakal

देवळा : कसमादे भागातील ज्या काही शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर लाल कांद्याचे पीक घेतले आहे. ते पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. पाण्याचे कमी प्रमाण व उन्हाची तीव्रता यामुळे कांद्याची पात करपू लागली असून कांदा गळीत होत नसल्याचे चित्र देवळा तालुक्यात आहे.

थंडीचे प्रमाण अजिबातच नसल्याने पिकांना पोषक हवामान मिळत नसून यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे. (Time to abandon the crop due to lack of water Tears in eyes of onion farmers nashik)

आता आता कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळू लागल्याने शेतकऱ्यांनी लाल कांद्यावर लक्ष केंद्रित केले होते. आतापर्यंत नवीन कांद्याची मोठी आवक अपेक्षित होती, परंतु दिवसेंदिवस पाण्याचे प्रमाण कमी कमी होत असल्याने या पिकांना पाणी देण्यास मर्यादा पडू लागल्या आहेत.

त्यामुळे या अशा प्रतिकूल वातावरणामुळे कांदा जमत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. टँकरचे पाणी पुरत नाही आणि टाकावे म्हटले तरी ते आणावे कोठून हा प्रश्न कांदा उत्पादकांसमोर आहे. यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक अर्धवट सोडून दिली आहेत.

पीक समोर दिसत असताना पाण्याअभावी पिके सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. काहींनी कूपनलिका खोदत पाणी शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातही अपयश आले. अमाप खर्च करून शेतमालाचे उत्पादन नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते विस्कटली आहेत.

सध्या उन्हाळ कांदा संपत आल्याने लाल कांद्याची मागणी वाढली आहे. भावही चांगला मिळत आहे. पण पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे कांद्याचे उत्पादन घेणे अशक्य झाले आहे. डोळ्यांदेखत भाव मिळत असलेल्या कांद्याचे पीक करपू लागल्याने शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे.

Onion crop left by the farmers due to decrease in water level in the area and no fall of onion
Onion Subsidy: शेतकरी, निराधारांची यंदाची दिवाळी गोड! राज्यात कांदा अनुदानासाठी 'इतके' कोटी मंजूर

डाळिंब बागांची अवस्था बिकट

डाळिंबाच्या बागांचीही अशीच अवस्था झाली आहे. बागांना पाणी पुरत नसल्याने या बागा कशा जगवावे असा प्रश्न आहे. यामुळे अर्धी कच्ची फळे विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

"यावर्षी पाण्याअभावी कांदा व डाळिंब या दोन्ही नगदी पिकांचे उत्पादन घेणे अवघड झाले आहे. यामुळे शेतीतून उत्पादन मिळण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. दुष्काळाची सर्वात अधिक झळ शेतकऱ्यांना आहे. शासनाने याची दखल घेत दिलासा द्यावा."

- शिवाजीराव पवार, संचालक देवळा बाजार समिती.

"आमच्या कापशी गावात एकूण खरीप कांद्याची ९५ टक्के लागवड झाली होती. पण पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांनी लागवड करून दिलेले हे क्षेत्र सोडून दिले आहे. प्यायलाच पाणी नाही तर कांद्याच्या शेताला कोठून पाणी देणार. यामुळे कांद्याचे पीक घेणे अशक्य झाले आहे."

- जयदीप भदाणे, तालुकाध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Onion crop left by the farmers due to decrease in water level in the area and no fall of onion
Onion Price : ‘कांद्याला भाव नाही मिळत नाही म्हणून शेतकरी नाराज, दुसरीकडे वाढत्या दरांमुळे ग्राहकांच्या डोळ्यात पाणी’ हा विरोधाभास का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com