नाशिक- वादग्रस्त वक्तव्यांनी अडचणीत सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद काढून घेण्यासाठी दबाव वाढत असताना राष्ट्रवादी दोन मंत्र्यांमध्ये खांदेपालट करण्याची शक्यता आहे. कोकाटेंचे कृषिमंत्रिपद हे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कोकाटे यांना पाटील यांच्या मदत व पुनर्वसन खात्याचा कारभार सोपविला जाऊ शकतो.