मनमाड: इंदूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर नेहमीप्रमाणेच वर्दळ असताना शनिवारी पहाटे मनमाड जवळील गोरखनगर परिसरात आंबेवाडी फाट्याजवळ एक अवजड कंटेनर रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात गेल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.