मनमाड- मनमाड-नांदगाव रोडवरील वरद संकुल येथे महावितरणच्या निष्काळजी कारभाराचा प्रत्यय पुन्हा एकदा नागरिकांना आला. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसात उघड्यावर असलेल्या ट्रान्स्फॉर्मरमुळे जोरदार विजेचा धक्का बसल्याने गाय गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली.