Railway Project
sakal
मालेगाव शहर: मध्य रेल्वेने मनमाड- इंदूर नवीन रेल्वेमार्ग (३०९.४३ किलोमीटर) प्रकल्पात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत हवाई भू-भौतिकीय सर्वेक्षणासाठी ई-निविदा जाहीर केली आहे. या सर्वेक्षणात चुंबकीय इमेजिंग व व्हिडिओ रेकॉर्डिंगद्वारे जमिनीची रचना सखोल तपासली जाईल, ज्यामुळे पुढील बांधकाम प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.