Manmad–Indore Rail
sakal
मनमाड: बहुप्रतिक्षित मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाला अखेर निर्णायक गती मिळाली आहे. मध्य प्रदेशातील भूसंपादनाला मोठा वेग मिळत असताना, मनमाड शहरातही प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली आहे. शहरातील गर्डर शॉप परिसरातील सुमारे १०० कुटुंबांतील ६५० वारसांना भूमिअभिलेख विभागातर्फे भूसंपादनाच्या नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. या जमिनींची मोजणी १५ डिसेंबरला वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असून, सर्व संबंधितांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.