Manmad Indore Rail Project
sakal
मालेगाव शहर: मनमाड–इंदूर रेल्वे प्रकल्पांतर्गत भूसंपादनामुळे सर्वाधिक बाधित नागरिकांची संख्या धुळे जिल्ह्यात आढळून आली आहे. धुळे तालुक्यातील लळिंग गावात एक हजार ६१ नागरिकांच्या जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. या प्रकल्पातील एकाच गावातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भूसंपादनाचा प्रकार मानला जात आहे. विशेष म्हणजे या भूसंपादनात ग्रामपंचायत भवनाचाही समावेश आहे.