नाशिक- बहुप्रतिक्षित मनमाड- इंदूर दुहेरी रेल्वेमार्गासाठी जिल्ह्यातील २१ गावांमधील ३५४.२३ हेक्टर क्षेत्र भूसंपादनासाठी निश्चित करण्यात आले आहे. मात्र, यासाठी आवश्यक असलेल्या संयुक्त मोजणी प्रक्रियेला अद्याप सुरुवात होऊ शकलेली नाही. याचे कारण म्हणजे, सुमारे अडीच कोटी रुपयांचे मोजणी शुल्क रेल्वे प्रशासनाने महसूल विभागाकडे भरलेले नाही. परिणामी, मोजणीची प्रक्रिया सध्या केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहिली आहे, अशी माहिती महसूल प्रशासनातील सूत्रांनी दिली.