Central Railway
sakal
नाशिक
Central Railway project : प्रवाशांना दिलासा! मनमाड-जळगाव तिसरी रेल्वेलाइन यशस्वीरीत्या सुरू; वाहतूक आणि वेगात मोठी वाढ
Successful Commissioning of the Manmad-Jalgaon Third Railway Line : मध्य रेल्वेच्या मनमाड-जळगाव तिसऱ्या रेल्वेमार्ग प्रकल्पातील १६० किलोमीटर लांबीची तिसरी लाइन यशस्वीरीत्या कार्यान्वित झाली असून, यामुळे मार्गावरील वाहतूक क्षमता आणि रेल्वेची गती मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे.
मनमाड: मध्य रेल्वेच्या मनमाड-जळगाव तिसऱ्या रेल्वेमार्ग प्रकल्पातील संपूर्ण १६० किलोमीटर तिसरी लाइन सोमवारी (ता. २४) यशस्वीरीत्या सुरू करण्यात आली असून, या प्रकल्पामुळे मार्गावरील वाहतूक क्षमता, गती आणि रेल्वेची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
