मनमाड: मनमाडसाठी एक ऐतिहासिक क्षण ठरावा असा महत्त्वपूर्ण निर्णय नुकताच घेण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड एमआयडीसी प्रकल्पाला राज्य शासनाने अधिकृत औद्योगिक वसाहतीचा दर्जा बहाल केला आहे. या निर्णयामुळे स्थानिकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होणार असून, मनमाडसह संपूर्ण नांदगाव तालुक्यात औद्योगिक विकासाला गती मिळणार आहे.