भाऊबीजेलाच ३ बहिणींच्या एकुलत्या भावाची निघाली अंत्ययात्रा

manmad crime
manmad crimeesakal

मनमाड : दिवाळी (diwali ) हा आनंदाचा सण असतांना मनमाड रेल्वे स्थानकात (manmad railway station) आज मन हेलावून टाकणारी घटना समोर आली. ऐन भाऊबीजेच्या दिवशी भावाची निघृन हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली.

ऐन भाऊबीजेच्या दिवशी भावाची निघृण हत्या

भाऊबीजेच्या दिवशी तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ आणि आई वडिलांच्या लाडक्या मुलाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने चांदवडच्या उसवड गावातील पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रेयसीच्या डोळ्यासमोर प्रियकराला चाकूने सपासप वार करून चार आरोपी नंदीग्राम एक्सप्रेसने कल्याणकडे फरार झाले या घटनेचा पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहे. चांदवड तालुक्यातील उसवड या गावी राहणारा शिवम संजय पवार असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याला तीन बहिणी आहेत. संजय जगन्नाथ पवार यांचा शिवम हा एकुलता एक मुलगा आहे ऐन भाऊबीजेच्या दिवशी ही हत्या झाल्यामुळे संपूर्ण पवार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर उसवड गावावर शोककळा पसरली आहे ही हत्या इंस्टाग्रामवर फेकआयडी करुन अश्लिल फोटो टाकल्याचा राग आणि प्रेम प्रकरणातून करण्यात आल्याचे समोर आले आहे.

इंस्टाग्रामवर फेक आयडी

पोलिसांच्या तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथे राहणाऱ्या मनीषा नावाच्या तरुणीसोबत मोबाईलच्या इंस्टाग्रामवरुन शिवमची अडीज वर्षांपूर्वी ओळख झाली या दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते दोघेही एकमेकांच्या संपर्कात असतांना आपली प्रेयसी तिच्या तीन मित्रांसोबत फिरते, फोनवर बोलते आणि मॅसेजवर चाट करत असल्याचा राग शिवमच्या मनात होता या संशयावरून शिवमचे या तिघांमधील एकासोबत आणि आपल्या प्रेयसीशी फोनवर जोरदार भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून शिवमने यातील चेतन आणि मोहित नावाच्या तरुणांच्या नावाने इंस्टाग्रामवर फेकआयडी करुन त्यांचे अश्लिल फोटो टाकले. हा राग मनात धरून चेतनने शिवमला फोन करून इंस्टाग्रामवर माझी फेक आयडी करुन माझे अश्लील फोटो का टाकले याबाबत विचारणा केली मीच तुझा फेक आयडी तयार केला असून तू मनिषा सोबत संबध ठेवु नको. नाहीतर तुला आणखीन बदनाम करून टाकेल अशी शिवमने फोनवर सांगत तिघांचे जोरदार भांडण झाले. तु आमच्या सोबत कामावर राहते त्यामुळे शिवमने त्याचा राग धरून आमच्या इंस्टाग्रामवर फेक आयडी तयार केला आम्हाला बदनामी करतो आहे त्याचा गैरसमज दूर करण्यासाठी त्याला इकडे बोलावुन घेण्याचे मनिषाला सांगितले मात्र शिवमला कल्याणला बोलावले असता त्यानेच या सर्वांना मनमाडला बोलावून घेतले त्यानुसार शिवमची प्रेयसी मनीषा तिचे मित्र चेतन, मोहित, निल आणि मयूर असे पाच जण कल्याण स्टेशनवरुन ( ता ५) संध्या ७.३० वाजता पंचवटी एक्सप्रेसने बसून रात्री ११:३० वाजता मनमाड स्टेशन गाठले शिवमने त्यांना स्टेशनवरील पार्सल कडे येण्यास सांगितले तेथे गेल्यावर शिवमने मनीषाला मारहाण करत भांडण केले. त्यानंतर शिवमने या चार जनांसोबत भांडण झाले. शिवम रागात असल्याचे पाहून हे पाचही जण मनमाड येथुन परत कल्याणकडे जाण्यासाठी स्टेशनवर आले त्याच वेळी फलाट क्रं ४ वर नंदीग्राम एक्सप्रेस थांबलेली होती.

manmad crime
अहमदनगर : १५ मिनिटे, अग्नितांडव आणि १० बळी, वाचा नेमकं काय घडलं?

गाडीत बसण्यासाठी जातांनाच पुन्हा शिवम मागून आल्यावर त्यांच्यात भांडण झाले या भांडणात शिवमने मोहीत व त्याचे मित्रांना शिवीगाळ करु लागला त्याला फेक आयडी बंद करून टाक व हा वाद संपवुन टाकु असे सांगितले परंतु तो काहीएक एकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यामुळे मोहीत व त्याचे मित्रांनी त्याला पकडुन मारहाण केली त्याला लाथाबुक्यांनी मारले. मयुरने चाकुने भोसकून सपासप वार करून ते चारही जण धावती गाडी पकडून पसार झाले प्रेयसीसमोर प्रियकराला चाकूने भोसकण्यात आले रक्ताच्या थारोळ्यात पडलेला प्रियकर पाहून मदतीसाठी आरडाओरडा करत होती तेथे काही वेळाने पोलीस आले त्यांनी शिवमला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र शिवम याच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. या हल्ल्यात शिवम गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिने तिच्या मोहीत, चेतन, निश, मयुर या चार मित्रांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पोलीस तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहे. विशेष म्हणजे आज भाऊबीज आपल्या लाडक्या भावाचे बहीण औक्षणं करते मात्र ऐन भाऊबीजेच्या दिवशी भावाची निघृन हत्या झाल्याचा आघात शिवमच्या तीनही बहिणींना बसला ऐन भाऊबीजेला या तिन्ही बहिणी भावाला पोरक्या झाल्या आहेत.

manmad crime
अहमदनगर: मुख्यमंत्र्यांकडून आगीच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com