Nashik News: मनमाड नाशिक- मुंबई प्रवास करणारे चाकरमानी प्रवासी आंदोलनाच्या पावित्र्यात!

movement
movementesakal

नाशिक रोड : नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सध्या झोपले आहे का, असा सवाल सध्या मनमाड- मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमानी, व्यावसायिक, महिला नोकरदार आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

नाशिकच्या पळवल्या आणि वळवल्या जात आहे. मात्र नाशिकच्या लोकप्रतिनिधींना सोयरसुतक नाही. आता पंचवटी जालन्यापासून सुटणार, असे वृत्त आल्यामुळे प्रवाशांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मनमाड नाशिक- मुंबई प्रवास करणारे प्रवासी सध्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. (Manmad Nashik Mumbai traveling Chakarmani Pravasi Andolan News)

नाशिककरांच्या हक्काच्या गाड्या अनेक दिवसांपासून इतरत्र स्थानकांवर वळवल्या जात आहे. तपोवन एक्स्प्रेस नाशिकहून वळविण्यात आली. पुणे भुसावळ मार्ग बदलला. नाशिकच्या रेल्वे स्थानकाला फाटा दिला.

राज्यराणी मनमाड मुंबई होती ती आता नांदेडला घेऊन गेले. गोदावरी- मनमाड कुर्ला होती ती आता धुळ्यापर्यंत घेऊन गेले. सध्या ४६ वर्षाहून अधिक वर्ष प्रवाशांना सेवा देणारी पंचवटी एक्स्प्रेस जालन्यावरून सुटणार, अशी अफवा पसरते आहे.

त्यामुळे मनमाड ते थेट नाशिक मार्गे मुंबई प्रवास करणारे किमान दीड ते पावणेदोन हजार प्रवासी अस्वस्थ झाले आहे. त्यांचा आक्रोश आता सोशल मीडियासह प्रत्यक्ष स्वरूपात दिसायला लागला आहे. अनेक प्रवाशांनी काळ्या फिती लावून प्रवास करायला सुरवात केली आहे.

movement
Nashik News: सप्तशृंग गड अन्‌ वणी-शिर्डी रस्ता साईमय! गुजरातमधील भाविकांमध्ये तरुणांसह महिला अधिक

"लोकप्रतिनिधींनी या सामाजिक प्रश्नाकडे लक्ष देऊन हा प्रश्न तडीस नेण्याची आवश्यकता आहे नाशिककरांच्या हक्काच्या रेल्वे गाड्या पळवल्या जात आहे त्यामुळे नाशिकच्या प्रवाशांना प्रवास करायला अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे."

- वामन सांगळे, रेल्वे इंजिन तज्ज्ञ

"आमची हक्काची पंचवटी एक्स्प्रेस वाढवण्याचा प्रयत्न रेल्वे बोर्डाने करू नये. लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन रेल्वे बोर्डाला जाब विचारण्याची आवश्यकता आहे. पंचवटी एक्स्प्रेसचा मार्ग बदलला तर आम्ही स्वस्त बसणार नाही. न्यायालयात याचिका दाखल करू."

- किरण बोरसे, उपाध्यक्ष, प्रवासी वेल्फेअर असोसिएशन

movement
Nashik News: प्रस्तावित कृषी निविष्ठा कायद्यांना शेतकरी संघटनेचा विरोध : रघुनाथ पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com