Nylon Manja
sakal
मनमाड- नाशिक: नायलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघातांच्या घटना सातत्याने वाढत असून, शहरातील प्रसिद्ध महिला डॉक्टर नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी झाल्या. त्यांना २५ टाके पडले आहेत. बंदी असूनही नायलॉन मांजाची शहरात विक्री होतेच कशी, असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.