नाशिक/मनमाड- मुंबई- मनमाड- बिजवासन या उच्च दाबाच्या भूमिगत पेट्रोलियम पाइपलाइनला अनकवाडे शिवारात छिद्र पाडून पेट्रोलची चोरी करणाऱ्या टोळीचा मनमाड पोलिसांनी शिताफीने तपास करीत पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच संशयितांना अटक करण्यात आली असून, यात अनकवाड्यातील शेतकऱ्याचाही समावेश आहे. तर तिघे संशयित फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी मनमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.