मनमाड: नागपूर अजनी-पुणे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचे मनमाड रेल्वेस्थानकावर अभूतपूर्व जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वेस्थानकावर फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘भारतमाता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मनमाड जंक्शनवर फलाट क्रमांक चारवर गाडी दाखल होताच नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला.