Eknath Shinde
sakal
मनमाड: मनमाड शहराचा पाणीप्रश्न मार्गी लावला असून, लवकरच भीमसृष्टी उभारण्याच्या कामांना वेग दिला जाणार आहे. इदगाहचे कामही सुरू करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमाड येथे महायुतीच्या प्रचारसभेत केली. ‘सर्व जागा शिवसेना-भाजप महायुतीतून लढत असून, नगराध्यक्षपदासाठी योगेश पाटील तसेच नांदगाव नगराध्यक्षपदासाठी सागर हिरे निश्चित विजयी होतील. विजयाचे फटाके फोडायला तयार राहा, विरोधकांचा बँड वाजवायचा आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.