Nashik : रतन इंडिया सुरू होण्यात अनेक अडचणी

RattanIndia
RattanIndiaesakal

एकलहरे (जि. नाशिक) : सिन्नर , गुळवंच येथील रतन इंडिया औष्णिक प्रकल्प (thermal Power Projects) विविध समस्यांनी वेढला असल्याने हा प्रकल्प सुरू करण्यात अनंत अडचणी आहेत. रतन इंडिया ची उभारणी सुमारे 10 वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला आहे. रतन इंडियाकडे कोळसा (Coal) हाताळणी प्रकल्प नाही (सी एच पी) नाही तसेच फ्युएल सप्लाय अग्रीमेंट (Fuel Supply Agreement) नसल्याचे समजते. (Many difficulties in starting Ratan India Nashik News)

पाण्याचा पुरवठा देखील नाशिक औष्णिक वीज केंद्राच्या राखीव बंधाऱ्याजवळील पंपातून होतो. या प्रकल्पाच्या चाचणीच्या वेळी पाईप लाईन फुटून दुर्घटना घडली होती मात्र सुदैवाने यात थोड्याफार वाहनांच्या नुकसानीव्यतिरिक्त जीवित हानी झाली नाही. हा प्रकल्प सुरू होण्यासाठी अजून कोळसा वहन व्यवस्था नाही.रस्ता मार्गे कोळसा वहन करणे ही तसे अवघडच आहे. प्रकल्प किमान दहा वर्ष रखडल्यामुळे येथील यंत्रही निकामी झाल्याची शक्यता आहे.

असे एक ना अनेक अडचणी असतांना रतन इंडिया सुरू करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती पॉवरफुल असल्याने हा प्रकल्प सुरू करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू आहेत तर नाशिक औष्णिक केंद्राचा बदली संच अजून ही कागदावरच रेंगाळतो आहे. याकडे जिल्ह्याचे हेवी वेट असणाऱ्या नेत्यांचेही लक्ष नाही एकीकडे सिन्नर तालुक्यातील हजारो हातांना काम मिळावे यासाठी प्रयत्न होत असताना नाशिक औष्णिक प्रकल्पातील हजारो हात निकामी होणार आहे याकडे कुणाचेही लक्ष नाही.

RattanIndia
Nashik : RTE च्‍या ३३ टक्‍के जागा रिक्‍तच

ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांचा उद्या नाशिक औष्णिक वीज केंद्रात पाहणी दौरा असून महापारेषण , महावितरण (MSEDCL) या तिन्ही कंपनीच्या अधिकाऱ्याची बैठक होणार आहे . या बैठकीतून नाशिक औष्णिक वीज केंद्रासाठी काय सकारात्मक निर्णय घेतला जातो याकडे पंचक्रोशीचे लक्ष लागले आहे.

RattanIndia
Nashik : पंचवटी एक्सप्रेस मध्ये प्रवाशांचा अंधारातच प्रवास

"नाशिक प्रकल्प ची भांडवली खर्च कमी असून तो क्रिटिकल टेक्नॉलॉजी वर आधारित आहे. त्यामुळे सिन्नर च्या तुलनेत नाशिकचा संच निश्चितच परवडणारा असेल."

- शेखर आहेर (सचिव , संघर्ष समिती)

"सिन्नर साठी मूलभूत असणाऱ्या सुविधांचा वानवा असल्याने ,नाशिक औष्णिक बदली संचाचा विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे गरजेचे आहे." - विनायक हारक उपाध्यक्ष , संघर्ष समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com