Latest Marathi News | बेशिस्त चालकांमुळे अनेकांची जीव धोक्यात!; जिवाची पर्वा न करता वाहतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A rickshaw plying on the flyover in violation of rules

Nashik : बेशिस्त चालकांमुळे अनेकांची जीव धोक्यात!; जिवाची पर्वा न करता वाहतूक

सिडको (जि. नाशिक) : महामार्गावरील उड्डाणपुलावर अनेकदा वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही सुरू असते. येथून अनेक बेशिस्त रिक्षाचालक व दुचाकीचालक मुंबई नाका ते द्वारकेदरम्यान वाहन भरधाव जातात. अशात लांबूनच पोलिसांची मोहीम सुरू असलेले बघताच स्वतःच्या व प्रवाशांच्या जिवाची पर्वा न करता माघारी उलट फिरत कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करत असतात. अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे भीषण अपघाताची दाट शक्यता नाकारता येत नाही. हे वाहनचालक स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत. (Many lives are in danger due to reckless drivers Traffic without regard for life Nashik Latest Marathi News)

वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावर इतरत्र उभे न राहता जेथून उड्डाणपुलास पंक्चर तयार करण्यात आले आहे, अशा ठिकाणी उभे राहायला हवे अशी मागणी होत आहे.
मुंबई नाका तसेच द्वारकेकडे जाणाऱ्या रोडवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असल्याने ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सिडको तसेच अंबड औद्योगिक वसाहतीतील दुचाकीचालक स्टेट बँक चौक तसेच गरवारे येथून उड्डाणपुलाचा वाहतुकीसाठी वापर करतात. या उड्डाणपुलावर चारचाकी वाहने तसेच मालवाहू वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच वाहतूक पोलिसांकडून उड्डाणपुलावर दुचाकी वाहनांना परवानगी आहे की नाही, याबाबत जनजागृती करत येथे मोठे वाहनांना निषेधाचे फलक स्पष्ट दिसतील. अशा स्वरूपात लावायला हवे.

बेशिस्त वाहनचालकांमुळे दर वर्षी होणाऱ्या अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असून, केवळ या वाहनचालकांमुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तर अनेक परिवाराचा आधारदेखील हिरवला गेल्याच्या घटना घडत आहे. उड्डाणपुलावर पोलिस कार्यवाही टाळण्यासाठी स्वतःसह अनेकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहनचालकांमुळे अपघाताची पुन्हा घडू नये याकरिता वाहतूक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून उड्डाणपुलावर पंक्चर असलेल्या ठिकाणी उभे राहवून कार्यवाही केल्यास ही बेशिस्त वाहनचालक येथून वाहनच नेणार नाही अथवा त्याच्यावर कार्यवाही करणे सोपे होऊ शकेल.

हेही वाचा: Nashik Crime News : दुचाकी चोरट्यांचा सुळसुळाट!; 4 दुचाक्या लंपास

"अनेकदा राणेनगर ते द्वारका ब्रीजवर वाहतूक पोलिस नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कार्यवाही करण्यासाठी उभे असतात. परंतु दूर अंतरावरून वाहतूक पोलिस दिसल्यानंतर वाहनचालक दंडात्मक कार्यवाही होईल या भीतीने जिवाची पर्वा न करता गाडी परत फिरून जिथून रस्ता मिळेल तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये भीषण अपघात होण्याची दाट शक्यता आहे." - राम फसाटे, सामाजिक कार्यकर्ते

"वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर शासन व्हायलाच हवे. परंतु विल्होळी नाका ते आडगाव नाक्यापर्यंत उड्डाणपुलास जिथे जिथे पंक्चर असतील अशा ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक केल्यास उड्डाणपुलावर प्रवेश करू शकणार नाही. केल्यास त्यास तत्काळ तिथेच दंड करण्यात येईल. यामुळे अपघाताचा धोका नक्की टाळण्यास मदत होऊ शकेल."

- प्रीतम भामरे, सामाजिक कार्यकर्ते

हेही वाचा: Fraud Crime : ओझरच्या सिद्धिविनायक पतसंस्थेत 3 कोटीचा गैरव्यवहार; चौघांना अटक