Nashik IT Raid : आयकर छापेमारीच्या भीतीने अनेकजण परदेशात! सुटीचा आनंद लुटण्याचे कारण

Income Tax
Income Taxesakal

Nashik IT Raid : शहरातील काही बड्या बांधकाम व्यावसायिकांसह बांधकाम साहित्य पुरवठादार सुटीचा आनंद लुटण्यासाठी परदेश दौऱ्यावर गेले आहेत. मात्र, सुटीचे कारण दिले जात असले तरी यामागे आयकर विभागाकडून होत असलेली छापेमारी कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. (Many people abroad for fear of income tax raid nashik news)

आयकर विभागाच्या पुणे, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, मुंबई व नागपूर आयकर विभागाच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या पथकामार्फत मागील आठ दिवसांपासून सुरू असलेली छापेमारी मंगळवारी (ता. २६) संपुष्टात आली. यात साडेतीन हजार कोटींहून अधिक बेहिशोबी व्यवहारांचे कागद व जवळपास सहा ते सात कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

आयकर विभागाकडून झालेल्या कारवाईमागे नाशिकच्या बांधकाम व्यवसाय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेली गुंतवणूक कारणीभूत मानले जात आहे जवळपास ३०० कोटींहून अधिक आयएएस अधिकाऱ्यांचा पैसा हा बांधकाम क्षेत्रात पोचला गेल्याने मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहे.

समृद्धी महामार्ग, प्रस्तावित सुरत- चेन्नई ग्रीन फिल्ड, हवाई सेवेचा विस्तार, नाशिक- पुणे रेल्वे मार्ग व महामार्गाचे विस्तारीकरण, प्रस्तावित मेट्रो निओ यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल, या अनुषंगाने गृहप्रकल्पामध्ये गुंतवणूक करण्यात आले आहे.

त्याचा परिणाम म्हणून मागील आठ दिवसांपासून नाशिकमध्ये आयकर विभागाची छापेमारी चालू आहे. जवळपास ४७ ठिकाणी टाकलेल्या धाडीतून सहा ते सात कोटी रुपयांची रोकड व साडेतीन हजार कोटींचे बेहिशोबी व्यवहारांचे कागदपत्र जप्त करण्यात आले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Income Tax
Political News: भाजपची नवी रणनीती; प्रणिती शिंदेंसाठी ‘मध्य’मध्ये डोकेदुखी

आयकर विभागाच्या धाडसत्रामुळे मोठ्या बांधकाम व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे. सुरवातीला आठ ते दहा बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई झाली असली तरी आणखीन काही बांधकाम व्यवसाय आयकर विभागाच्या रडारवर आहेत.

अनेकांनी सोडले नाशिक

आठ दिवसापासून आयकर विभागाचे पथक नाशिकमध्ये ठाण मांडून बसले असताना आपल्यावरही कारवाईची शक्यता गृहीत धरून अनेकांनी नाशिकमधून काढता पाय घेतला.

मुंबई व ठाणेसह पुणे, सुरत औरंगाबाद या शहरांबरोबरच अनेकांनी दुबई, सिंगापूर, मलेशिया गाठले. सुटीचा आनंद लुटण्यासाठी बाहेरगावी जावे लागल्याचे काहींचे म्हणणे आहे, तर व्यवसायाचे निमित्त करून अनेकांनी नाशिकमध्ये न राहणे पसंत केले.

Income Tax
Solapur Politics: तेव्हा संजयमामा आता राजाभाऊ, जखमी झालेल्या जिल्हाबँकेने धरलंय बाळसं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com