Maratha Reservation: मराठा समाजातर्फे पंचवटीत जोरदार आंदोलन; आमदार खासदार मंत्र्यांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय

Community members protesting here for Maratha reservation.
Community members protesting here for Maratha reservation. esakal

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे- पाटील यांना समर्थन देण्यास सकल मराठा समाजातर्फे पंचवटीत जोरदार पवित्रा घेण्यात आला असून, आरक्षण मिळेपर्यंत आमदार, खासदार आणि मंत्र्यांना प्रवेश बंदी करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. (Maratha Reservation Decision to ban entry of MLAs MPs and Ministers in Panchavati nashik news)

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच ॲड. गुणरत्न सदावर्ते यांचा बैठकीत जोरदार निषेधही करण्यात आला. शनिवारी (ता. २८) घोषणा देत सकल मराठा समाजातर्फे पंचवटीत जोरदार आंदोलन करण्यात आले. शहीद समाजबांधवांना या वेळी श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

मराठा समाजास आरक्षण मिळेपर्यंत मंत्री, खासदार, आमदार आणि राजकीय पुढाऱ्‍यांना पंचवटी विभागात फिरकू देणार नाही. त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही सकल मराठा समाजाने घेतला आहे.

Community members protesting here for Maratha reservation.
Maratha Reservation चा वेळीच निर्णय घ्या, अन्यथा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही; आमदार शिंदेंचा स्पष्ट इशारा

तसेच, छगन भुजबळ यांचे जे समर्थ समर्थन करतील, त्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांना आगामी सर्व निवडणुकांत मतदान न करण्याचा तसेच त्यांच्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

या वेळी तुषार जगताप, नरेश पाटील, राहुल पवार, सचिन ढिकले, श्याम पिंपरकर, संतोष पेलमहाले, विलास जाधव, संजय पडोळ, प्रफुल्ल पाटील, राहुल बोडके, किरण पाणकर, किरण काळे, सुनील निरगुडे, दीपक दहिकर, अमित नडगे, सचिन शिंदे, सुरेश सोळंके, कुणाल भंवर, नीलेश मोरे, प्रशांत वाळुंजे, दत्ता भगत, गौरव शितोळे, मोहन गरुड मंगेश कापसे, संकेत नडगे, गणेश नडगे, सनी आंडे, ज्ञानेश्वर कवडे, रोहिणी उखाडे, प्रकाश उखाडे, प्रवीण आहेर, अनिल धूमणे, सुनील फरताळे, बंडू गटकळ, दिलीप सातपुते आदींसह समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान, पंचवटी परिसरातील अन्य सर्व समाजाने मराठा समाजाच्या आरक्षण मागणीस पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने या समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे,अशी भूमिका सर्व समाजाने मांडली आहे.

Community members protesting here for Maratha reservation.
Maratha Reservation : मुलीची दोन-तीन मार्कांनी नोकरीची संधी हुकली; पित्याचे अन्नपाणी त्यागत बेमुदत उपोषण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com