Vasant Gite
sakal
नाशिक: मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने हैदराबाद गॅझेट लागू केल्यावर राज्यात नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. या वाकयुद्धतून काही नेते पातळी सोडून विधाने करीत असून, माता-भगिनींपर्यंत जात आहेत. नेत्यांनी असे प्रकार थांबवावे, असे आवाहन माजी आमदार वसंत गिते यांनी केले आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राजकारणात काहींना पोळी भाजून घ्यायची असून, तेच जात-प्रवर्गात भांडणे लावत आहेत, असेही ते म्हणाले.