नाशिक: मराठा आरक्षणासाठी मुंबईत पोहोचलेल्या आंदोलकांची दररोजच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी नाशिकमधून भाकरी, ठेचा, बिस्कीटपुडे, पोळ्या आदी सामग्री व पाण्याच्या बाटल्या भरून २० पिक-अप रविवारी सकाळी रवाना झाल्या. त्याचबरोबर सोमवारीही तयार शिधा पाठविण्यात येणार आहे. समाजाच्या सर्व स्तरातून मदतीचा ओघ वाढत असल्याने आंदोलकांची सोय होत आहे.