MVP University
sakal
नाशिक: नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या रविवारी (ता. १४) झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तावरून पदाधिकारी पुन्हा आमनेसामने आले आहेत. सभेचे इतिवृत्त मला विश्वासात घेऊन व माझ्या संमतीने लिहिण्यात यावे, अशा आशयाचे पत्र अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले यांनी सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांना दिले आहे.