ग्रामीण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत ऑनलाइन शिक्षण; मविप्र-जिओमध्ये करार

online education
online educationgoogle
Updated on

नाशिक : कोरोना महामारीमुळे निर्बंध लागू असल्‍याने शाळा सुरू करण्यास मर्यादा येत आहेत. मात्र, ग्रामीण भागात तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडथळे निर्माण होतात. यावर तोडगा काढत मराठा विद्याप्रसारक समाज संस्‍थेतर्फे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण मोफत पोचविले जाणार आहे. त्यासाठी संस्थेने जिओ कंपनीसोबत करार केला असून, दर महिन्‍याला २८ जीबी डेटा हा टार्गेट पीक ॲपद्वारे अभ्यास करण्यासाठी मोफत उपलब्‍ध करून दिला जाणार आहे.

संस्‍थेच्‍या या पुढाकारामुळे विद्यार्थी, शिक्षकांची दरवर्षी किमान पंधराशे रुपयांपर्यंत बचत होणार आहे. मंगळवारी (ता. १७) मविप्र संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी यासंदर्भात माहितीपत्रक जारी केले जाणार आहे. गुगल फॉर्मद्वारे माहिती संकलित करून संबंधित शाळा-महाविद्यालयांमध्ये ऐच्छिक मोफत जिओ सीमकार्डसाठी स्वतंत्र शिबिर घेतले जाणार आहेत. इंटरनेटची सुविधा सुस्थितीत नसलेल्‍या ठिकाणी जिओ कंपनी मविप्रच्या सहकार्याने नवीन टॉवर्स उभारणी व त्‍यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच मोबाईल नंबर पोर्टेब्‍लीटीद्वारे इतर कंपनीचा मोबाईल क्रमांक जिओमध्ये पोर्ट केल्‍यावर दोन महिने रोज मोफत ३ जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंग सुविधा दिली जाणार आहे. संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार यांनी ही माहिती दिली.

online education
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत १७९ कोरोना बाधित
online education
लाचखोरी प्रकरणी वैशाली झनकर-वीर यांच्या कोठडीत १ दिवसाची वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Vidhan Parishad Election
What caused traffic congestion at Dwarka Chowk?
Declining rainy days impact on Nashik agriculture
Onion Purchase Irregularities Worth ₹54 Crore Surface; Investigation Demand Grows
Marathi News Esakal
www.esakal.com