लाचखोरी प्रकरणी वैशाली झनकर-वीर यांच्या कोठडीत १ दिवसाची वाढ

Dr. Vaishali Jhankar
Dr. Vaishali JhankarSakal
Updated on

नाशिक : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्‍या कारवाईत आठ लाखांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांच्‍या पोलिस कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. परंतु, प्रकृतीचे कारण देत त्या जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल झाल्‍या होत्‍या. यामुळे तपास करता न आल्‍याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे आणखी एक दिवस पोलिस कोठडी वाढविली आहे.

शिक्षण संस्‍थेच्‍या शाळांना मंजुर अनुदानातून नियमित वेतन सुरु करण्यासाठी कार्यादेशासाठी नऊ लाखांची मागणी करत व आठ लाखांवर तडजोड करुन चालकामार्फत स्‍वीकारल्‍याचा आरोप शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांच्‍यावर आहे. सोमवारी त्यांना न्‍यायालयात उपस्थित करण्यात आले होते. तपास होऊ न शकल्‍याने पुन्‍हा पोलिस कोठडीची केलेली मागणी न्‍यायालयाने मान्‍य करत एक दिवस कोठडीत वाढ केली. दरम्यान, मंगळवारी (ता. १७) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Dr. Vaishali Jhankar
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसांत १७९ कोरोना बाधित
Dr. Vaishali Jhankar
श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर बंद; लाखो भाविकांचा हिरमोड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Vidhan Parishad Election
What caused traffic congestion at Dwarka Chowk?
Declining rainy days impact on Nashik agriculture
Onion Purchase Irregularities Worth ₹54 Crore Surface; Investigation Demand Grows
Marathi News Esakal
www.esakal.com